Sunday, October 28, 2007
त्याचा जन्म लांड़ग्यांच्या कळपात झाला॰
या क्रूर जगात तो लहानचा मोठा झाला॰
कुत्र्यांशी त्याचं फक्त शत्रुत्वाचं नातं होतं॰
माणसांनी नेहमीचं त्याला झिडकारलं॰
खुनी म्हणूनचं त्याला सगळे ओळखत होते .
तो चोरी करून जगत होता॰
तो लांडगा होता का कुत्रा ते कधीच कोणी ठरवू शकलं नाही.
तो लांडग्यांपेक्षा हिंस्र होता॰
माणसांपेक्षा कुटिल होता॰
तो बुद्धिमान होता.
तो योद्धा होता.
एकांड्या,अस्थिर आणि रक्तरंजित वाटचालीत तो फक्त एकाच गोष्ट शोधत होता, ... प्रेम!' मानवी वाटावी एवढी हळूवार, चिंतनशील तरीही अविस्मरणीय कहाणी॰
अवश्य वाचा- जॅक लंडन ची अविस्मरणीय कादंबरी-व्हाइट फँग
मराठी अनुवाद :लांडगा
लेखक :अनंत सामंत
सौजन्य: मॅजेस्टिक प्रकाशन
Friday, October 26, 2007
वाचून झाल्यावर मनाला हुरहूर लावणारी कहाणी
मार्सेल पॅग्नोल यांच्या 'दी डेज वेअर टू शॉर्ट ' या आत्मचरित्राचे 'गेले, ते दिन गेले ' हे विलास फडके यांनीकेलेले स्वैर भाषांतर॰दिसायला बाहुलीसारखी नाजुक व सुंदर अशी आई, शाळेत शिक्षक असणारे वडील अणिमध्यमयुगीन घराण्याचा वारसा लाभलेल्या इसमाचे बालपण विशेष ते काय असणार? पण अशा सामान्यमाणसांच्या कुटुंबात एकमेकांवर असणारं प्रेम ,नीतिमुल्यांची चाड, लिलिसारख्या बालमित्राची निरपेक्षदोस्ती हे सारं मार्सेल पॅग्नोल यांनी इतकं हुबेहूब चितारलं आहे की, वाचकाला ते स्वतःचचं वाटावं.प्रख्यातफ्रेंच नाटककार,फ्रेंच अकाडमिद्वारा सन्मानित मार्सेल पग्नोल आपलं बालपण एखाद्याचित्रपटकथेप्रमाणे रंगवू शकले असते; पण त्यातही त्यांनी बालपणाचा निर्व्याजपणा कायम ठेवावा आणि तेदिवस फारच लौकर संपलं याविषयी हळहळ व्यक्त करावी याचं कारण ही कहाणी वाचल्यावरच समजेल॰
गेले, ते दिन गेले
लेखक:मार्सेल पग्नोल
अनुवादक: विलास फडके